Tap to Read ➤
चक्क नदीच्या पाण्यात मिळते सोने, अनेक लोक श्रीमंत बनले
सोने शोधण्यासाठी अनेक जण या नदीजवळ बराच वेळ मेहनत घेतात
जगात प्रत्येकालाच सोन्याचे प्रचंड आकर्षण असते. ते मिळविण्यासाठी अनेक जण काहीही करायला तयार असतात.
साधारणत: सोने खाणीतून काढले जाते. मात्र, काही ठिकाणी चक्क नदीत सोने आढळते.
अशी एक नदी कॅनडातील डॉसन शहरात आहे.हे शहर हे पर्यटनासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.
या शहराने अनेकांना श्रीमंतही केले. डॉसन शहर क्लोनडाइक नदीच्या किनारी वसले आहे.
नदीच्या तळाशी सोने असल्याचे बोलले जाते. सोने वाळूमध्ये तुकडे किंवा मोत्यांसारख्या प्रकारात आढळते.
याचे कारण म्हणजे, जवळपासच्या परिसरात सोन्याच्या खाणी आहेत. सोन्यासाठी अनेक जण नदीजवळ जमिनी घेतात.
प्रत्येकवेळी नदीत सोने सापडतेच असे नाही. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. डॉसन इथं मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले जाते.
अनेक जण काही दशकांपूर्वी स्वत: सोन्याच्या शोधात आले होते. ते आता पर्यटकांना सोने कसे शोधावे, हे शिकवतात.
क्लिक करा