Tap to Read ➤

नवजात मुलीसाठी ललिता सहस्त्रावर्तनातील सुंदर नावं!

मुलगी देवीचे रूप घेऊन आपल्या कुटुंबात जन्माला येते, म्हणून तिला ओळख देवीच्या नावानेच देता येईल!
मूल जन्माला आल्यावर पालकांना आपल्या पाल्यासाठी 'युनिक' नाव हवे असते; तुम्ही जर मुलीसाठी नाव निवडत असाल तर काही सुंदर नावं तुमच्यासाठी!
भाविका : जिचा चेहरा अतिशय बोलका आहे, जिला व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज नाही, जी भावनेतून व्यक्त होते.
मंजिरी : जिचे कान सुंदर आहे, जिच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता आहे आणि जिच्याकडे शांतपणे विषय हाताळण्याचे सामर्थ्य आहे.
मनसा : जिचे हास्य अतिशय लाघवी आहे, मधाळ आहे, जी आपल्या स्मित करण्याने समोरच्याला मोहून घेऊ शकते.
निश्चिंता : जी स्वतः कोणत्याही संकटाला घाबरत नाही आणि येणाऱ्या संकटांनी खचून जात नाही वा काळजी वाहत नाही.
पश्यन्ति : जी संपूर्ण विश्व स्वतःमध्ये पाहते आणि स्वतःला संपूर्ण विश्वामध्ये पाहते.
शिवाराध्या : जी शिवभक्त आहे आणि महादेवाला प्रिय आहे.
दाक्षायणी : दक्ष राजाची मुलगी ती दाक्षायणी, तसेच नेहमी कर्तव्यदक्ष असणारी!
स्वाधिना : जी एखाद्या कार्यासाठी, व्यक्तीसाठी किंवा आपल्या ध्येयासाठी सर्वस्व समर्पित करते.
अशी आणखी छान आणि अर्थपूर्ण नावं हवी असतील तर 'ललितासहस्त्र' नाम स्तोत्रात सापडतील.
क्लिक करा