Tap to Read ➤

'उभा राहा, मी आजारपणात विश्वचषक खेळलोय', युवराजने गिलला केले मोटिव्हेट

डेंग्यूमुळे आजारी असलेला शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळण्याबाबत अद्याप कुठलीही अपडेट आलेली नाही.
IND vs PAK: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर क्रिकेट सामना होणार आहे.
या दोन्ही संघांनी विश्वचषकात प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. पण, विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तान भारतासमोर कधीही विजयी झालेला नाही.
एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत, परंतु प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानचा दारुन पराभव केला आहे.
डेंग्यूमुळे आजारी असलेला 'भारतीय क्रिकेटचा प्रिंस' शुभमन गिल, या सामन्यात खेळणार की नाही, या बाबत अद्यात कुठलाही अपडेट आलेली नाही.
दरम्यान, शुभमन गिलचा मेंटॉर असलेल्या ऑलराउंडर युवराज सिंगने एका टीव्ही चॅनलशी बोलताना गिलविषयी चर्चा केली.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
मी गिलला सांगितले की, मी स्वत: प्रकृती बरी नसताना विश्वचषकात खेळलो. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचा सामना आहे.
मात्र, युवराजनेही डेंग्यूनंतर सावरणे सोपे नसल्याचे म्हटले. मला विश्वास आहे की, तो लवकर बरा होईल आणि या सामन्यात खेळायला तयार असेल.
शुभमन गिल 12 ऑक्टोबरला अहमदाबादला पोहोचला असून, सरावही सुरू केला आहे. पण, संघात स्थान मिळण्याबाबत संशय आहे.
क्लिक करा