पहिल्यांदाच टॅटू काढताय? लक्षात ठेवा 'या' गोष्टी

टॅटू काढण्यापूर्वी घ्या काळजी

टॅटू काढणं हा आजकालचा ट्रेंड झाला आहे. अनेकांच्या अंगावर १ किंवा २ पेक्षा अधिक टॅटू पाहायला मिळतात.

जर तुम्ही पहिल्यांदाच टॅटू काढण्यासाठी जात असाल तर काही गोष्टींची खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. म्हणूनच, टॅटू काढण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते पाहुयात.

टॅटूमधून तुमची पर्सनालिटी हायलाइट होत असते. तुमचे विचार, भावना या टॅटूमधून दिसून येतात. त्यामुळे टॅटूची निवड कायम विचारपूर्वक करा. ट्रेंड आहे म्हणून कोणाचाही पाहून तो टॅटू कॉपी करु नका.

टॅटू काढण्यापूर्वी तुमच्या स्किनची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. टॅटू काढून झाल्यानंतर त्वचेची काळजी घ्या. नाहीतर इंफेक्शन होण्याची शक्यता असते. टॅटू आर्टिस्टने सांगितलेली खबरदारी नक्की घ्या

टॅटू काढतांना कधीही प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टचीच निवड करा. तसंच ते वापरत असलेल्या सुया वा अन्य टुल्स नीट स्टेलरलाइज्ड आहेत की नाही याची खात्री करा.

शरीरातील हार्मोन्स बॅलेन्स करण्यासाठी खा 'हे' पदार्थ

Click Here