Tap to Read ➤
बूट काढल्यानंतर पायांना येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी ८ सोपे उपाय...
शूज काढल्यानंतर तुमच्याही पायांना खूप दुर्गंधी येते ? करा हे सोपे उपाय...
पाण्यात थोडासा बेकिंग सोडा घालून काहीवेळ त्यात पाय बुडवून बसावे. यामुळे दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया तर मरतीलच, पण पायाला संसर्गही होणार नाही.
कोमट पाण्यांत व्हिनेगर मिसळून या पाण्यांत १५ मिनिटे पाय बुडवून बसल्याने पायाला येणारी दुर्गंधी नाहीशी होते.
पायांना येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी अँटी - बॅक्टेरियल साबणाचा वापर केल्यास याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो.
चपला - बूट, सॉक्स यांना येणारा घाम यामुळे ही दुर्गंधी येते. त्यामुळे हा घाम व्यवस्थित सुकू द्यावा. यासाठी चपला - बूट, सॉक्स नीट उन्हांत वाळवून घ्यावे.
तुरटीचा भुगा पाण्यांत मिसळून या पाण्याने पाय धुतल्यास पायांना येणारी दुर्गंधी नाहीशी होते.
गरम पाण्यांत जाडे मीठ मिसळून रोज या पाण्याने पाय धुतल्यास पायांना येणारा कुबट वास नाहीसा होतो.
बुटांमध्ये थोडीशी टॅल्कम पावडर घालावी, यामुळे बुटांमधला ओलसरपणा व दुर्गंध दोन्हीही शोषून घेतले जाईल व दुर्गंधी नाहीशी होईल.
तांदूळ धुवून जे पाणी फेकून देतो त्या पाण्याने पाय स्वच्छ धुवून घेतल्यास पायांना येणारा कुबट वास नाहीसा होतो.
क्लिक करा