Tap to Read ➤

लिपस्टिक लावल्याने ओठ फुटू नये म्हणून ८ सोपे उपाय...

लिपस्टिक वापरल्याने ओठ खराब होण्याचा अनुभव अनेकांना येतो, काही सोप्या उपायांनी लिपस्टिकमुळे होणारं ओठांच नुकसान नक्कीच टाळता येतं...
ओठ मऊ ठेवण्यासाठी हळद व शुद्ध तूप एकत्रित करून रोज रात्री ओठांवर लावून मसाज करावा.
लिप बाममुळे ओठांची त्वचा ओलसर राहाते त्यामुळे लिपस्टिक लावल्याने ओठ कोरडे पडून फाटत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी कोणतेही नैसर्गिक तेल किंवा खोबऱ्याचं तेल लावून ओठांचा मसाज करावा. यामुळे लिपस्टिक लावल्यानंतर देखील ओठ मऊ राहतात.
लिपस्टिक लावण्याआधी ओठांना लायनर लावल्यामुळे ओठांच्या कडांवर लिपस्टिकचा थर साचत नाही व ओठांच्या कडा यामुळे सुकत, फाटत नाही.
दिवसभर ओठांवर लिपस्टिक लावून ठेवू नये, गरज नसेल तेव्हा ओठांवरची लिपस्टिक काढून टाकावी यामुळे ओठांचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
ओठांवरची लिपस्टिक काढताना क्लिंजिग मिल्क वापरावं, यामुळे ओठांचे नैसर्गिक सौंदर्य आहे तसेच टिकून राहते.
चेहरा फेसवाॅश किंवा साबणानं धुतांना चुकूनही ते ओठांना लावू नये. ओठांची त्वचा पातळ आणि संवेदनशील असल्याने ओठांवर वाईट परिणाम करतात आणि ओठ काळे व कोरडे पडतात.
रोज रात्री झोपण्याआधी ओठांना थोडी साय चोळून १ तासभर ती तशीच राहू द्यावी. झोपण्याआधी ओठांवरची साय काढून टाकावी. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतात.
क्लिक करा