गौतम अदानी रिटायर होणार का? मुलाकडे सोपवली मोठी जबाबदारी
अदानी समूहाच्या 'या' कंपनीच्या व्यवस्थापनात मोठे बदल झाले आहेत.
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) या अदानी समूहाच्या कंपनीच्या व्यवस्थापनात मोठे बदल झाले आहेत.
गौतम अदानी यांनी आपला मुलगा करन अदानी यांच्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
गौतम अदानींनी करन अदानी यांच्याकडे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टरची जबाबदारी सोपवली आहे. ते आतापर्यंत कंपनीचे सीईओ आहेत.
या बदलानंतर गौतम अदानी एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून कार्यरत होतील. आतापर्यंत मॅनेजिंग डायरेक्टर पदाची धुरा त्यांच्याकडे होती. अदानींनी आपल्या वयाची ६० वर्ष पूर्ण केली आहेत.
या बदलानंतरही अदानी संपूर्ण समूहाचे चेअरमन म्हणून कायम असतील. अदानींचा व्यवसाय अनेक क्षेत्रात पसरलेला आहे.
करन अदानी यांनी २००९ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१६ मध्ये ते कंपनीचे सीईओ बनले.
अदानी पोर्ट्स ही देशातील सर्वात मोठी पोर्ट आणि लॉजिस्टिक कंपनी आहे. शिवाय ती जगातील सर्वात तेजीनं वाढणारी ट्रान्सपोर्ट युटिलिटी कंपनीही आहे.