Tap to Read ➤
अचानक प्रसुती वेदना सुरू; स्वतः कार चालवत रुग्णालयात गेली अभिनेत्री
डिलिव्हरीच्या दिवशी नेमकं काय घडलं?; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव
गौहर खानने. चार महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आणि ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.
अभिनेत्री दररोज आपल्या मुलासोबतचे फोटो शेअर करते आणि पतीसोबत फनी रीलही पोस्ट करत असते.
गौहर खानने नुकताच तिच्या डिलिव्हरीच्या दिवशीचा अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्रीने सांगितलं की, तिने डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली होती. ती स्वत: हॉस्पिटलमध्ये जात होती.
त्यानंतर तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी पती सोबत होता. मात्र गौहरने कार चालवली.
गौहर म्हणाली, 'माझ्या पतीला माहीत आहे की मला गाडी चालवायला किती आवडतं.'
गौहरने पुढे सांगितले की, तिने साडेनऊ वाजता मुलाला जन्म दिला. गौहरच्या मुलाचं नाव जिहान आहे.
अभिनेत्रीने प्रसुतीनंतर 10 दिवसांत 10 किलो वजन कमी केले होते. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
अभिनेत्री अनेकदा वजन कमी करण्याच्या टिप्स देते. तिचे असंख्य चाहते आहेत.
क्लिक करा