Tap to Read ➤
आला रे आला गणपती आला
घरोघरी बाप्पांचे जल्लोषात स्वागत
गेल्या महिनाभरापासून उत्सुकता लागलेल्या गणपती बाप्पांचे आज सकाळी घरोघरी आगमन झाले आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत बाप्पांचे जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत झालंय
राजकीय नेते आणि सेलिब्रिटी अभिनेत्यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पांसाठी खास सजावट झालेली दिसून येते
बाप्पांच्या आगमनाचा उत्साह घरातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते, लाडक्या बाप्पांसोबत फोटो काढत लहानग्यांनी आनंद साजरा केला
बाप्पांची प्राणप्रतिष्ठा होताच आवडत्या मोदकाचा नैवैद्य दाखवून पूजा-आरतीही झाली
मोठ-मोठ्या गणेश मंडळांनीही बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात येथे बाप्पा आले
पुणे आणि मुंबईत मोठ्या मिरवणुकींनी गणरायाचे आगमन झाले, तरुणाई या उत्सवात दंग झाल्याचं पाहायला मिळालं.
गणपती बाप्पांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून तो स्टेटला ठेवणाऱ्या भाविकांचीही उत्सुकता वेगळीच दिसून येते
क्लिक करा