शुक्रवारचा टोटका: आंघोळ करता करता करोडपती व्हाल, ज्योतिषी त्रिशला...
ज्योतिषी त्रिशला यांनी शुक्रवारच्या दिवशी करावयाचा एक उपाय सांगितला आहे. जो आंघोळ करताना करायचा आहे.
ज्योतिषी त्रिशला यांनी शुक्रवारच्या दिवशी करावयाचा एक उपाय सांगितला आहे. जो आंघोळ करताना करायचा आहे. त्यांच्या व्हिडीओनुसार माणूस आंघोळ करता करता करोडपती होऊ शकतो.
काय करावे...
शुक्रवारी गुलाबाचे फूल घेऊन त्याची एक पाकळी तोडून बाजुला ठेवावी. उर्वरित पाकळ्या आंघोळीच्या पाण्यात टाकाव्यात.
तसेच बादलीत चिमुटभर हळद आणि एक रुपयाचे नाणे टाकावे. लक्ष्मी देवीचे स्मरण करत हे पाणी सातवेळा अंगावर ओतावे.
त्रिशला यांनी सांगितले की, या काळात माता लक्ष्मी आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत, असे मनात स्मरत राहिले पाहिजे.
आंघोळ झाल्यावर बाजुला ठेवलेली ती एक पाकळी गंगाजलाने शुद्ध करावी. ती देवघरात नेऊन त्यावर हळद-कुंकू अर्पण करावे.
ही पाकळी देवीचे स्मरण करत तुमच्या पर्समध्ये ठेवावी. किंवा ती तिजोरीतही ठेवता येते. चांदीच्या ताबीज किंवा पेटीत देखील ठेवता येते.
किती दिवस करावे...
हा उपाय तुम्हाला सात शुक्रवार करायचा आहे. प्रत्येक वेळी ही पाकळी हळद-कुंकवाने लेपण करून घ्यावी आणि सर्व पाकळ्या एकाच ठिकाणी ठेवाव्यात.
डिस्क्लेमर
हा उपाय पूर्णपणे ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे, त्रिशला यांनी सोशल मिडीयावरील व्हिडीओत सांगितल्यानुसार दिलेला आहे, त्याच्या परिणामांची लोकमत.कॉम पुष्टी करत नाही.