Tap to Read ➤
भारतीय महिला क्रिकेटवर 'राज' करणारी 'रणरागिणी'
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज सध्या पॅरिसमध्ये भटकंती करत आहे.
तिने तेथील काही फोटो शेअर केले आहेत.
भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर पोहचवणाऱ्या मिताली राजचे खूप चाहते आहेत.
१९९९ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी भारताकडून खेळण्यास सुरुवात करणारी मिताली या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे.
तिने १२ कसोटी, २३२ वन डे आणि ८९ ट्वेंटी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि टीम इंडियाला दोनदा विश्वचषकाच्या फायनलपर्यंत नेले.
वन डेमध्ये ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने सात शतके आणि ६४ अर्धशतकांसह ७८०५ धावा केल्या आहेत.
वयाच्या ३९व्या वर्षी तिने क्रिकेटला रामराम केले.
क्लिक करा