सुरेश रैना पत्नी प्रियांकासह महाकुंभ मेळाव्यात; इथं पहा खास फोटो
सुरेश रैना अन् त्याची पत्नी प्रियांका यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाकुंभ मेळ्यातील खास क्षण दाखवणारे फोटो शेअर केले आहेत.
माजी क्रिकेटर सुरेश रैनानं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून पत्नी अन् मित्रांसोबत महाकुंभ मेळाव्यात सहभागी झाल्याची माहिती शेअर केली आहे.
भारत सरकार आणि योगी सरकारनं महाकुंभ मेळाव्यासाठी जी व्यवस्था केली आहे ती एकदम भारी आहे, असेही त्याने म्हटले आहे. त्याने प्रयागराज परिसरातील काही खास क्षणही दाखवले आहेत.
प्रयागराज इथं आल्यावर समाधानकारक वाटते, हा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खूपच उत्साही असल्याची भावनाही क्रिकेटरनं बोलून दाखवलीये.
सुरेश रैनाची पत्नी प्रियांका हिने देखील आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून एक खास फोटो शेअर केला आहे.
सुरेश रैना आणि प्रियांका चतुर्वेदी ही जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात.
रैना अन् त्याची पत्नी भक्तीभावानं अन् मोठ्या श्रद्धेनं देव दर्शनासाठी बाहेर पडल्याचे याआधीही पाहायला मिळाले आहे.
केरळातील पद्मनाभस्वामी मंदिरात जोडीनं देव दर्शनाला गेल्याचे फोटो प्रियांका रैना हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते.