Tap to Read ➤

Ronaldo ने सलमान खानला केले इग्नोर; नेटकऱ्यांनी उडवली भाईजानची खिल्ली

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात सलमान खान आणि रोनाल्डो शेजारी बसलेले दिसत आहेत.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचे जगभराच चाहते आहेत. सलमान कुठल्याही देशात गेला, तिथे तो चाहत्यांच्या गराड्यात असतो. लाडक्या भाईजानची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर असतात.
पण, सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात फूटबॉल सुपरस्टार रोनाल्डोने सलमान खानकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
सलमान नुकताच फ्रान्सिस नगानौ आणि टायसन फ्युरी यांच्यातील हाय-प्रोफाइल हेवी वेट बॉक्सिंग सामना पाहण्यासाठी सौदी अरेबियातील रियाधला गेला होता.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
या हायप्रोफाईल बॉक्सिंग मॅचला जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. एका व्हिडिओमध्ये सलमान आणि रोनाल्डो फाईट संपल्यानंतर बाहेर पडताना दिसत होते.
व्हिडिओमध्ये रोनाल्डो इतर सेलिब्रिटींना आणि इतर मान्यवरांना भेटताना आणि त्यांना मिठी मारताना दिसतोय. तो सलमान खानपासून काही पावले दूर उभा होता.
यावेळी रोनाल्डोने सलमानकडे पाहिलेही नाही आणि तो पुढे निघून गेला. व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान आणि रोनाल्डो यांच्यात कोणताही कॉन्टॅक्ट झालेला दिसत नाहीये.
हे पाहून रोनाल्डोने सलमानकडे दुर्लक्ष केल्याचा दावा लोक करत आहेत. युजर कमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय अपमान, टायगर फक्त भारतातच जिवंत आहे, अशाप्रकारच्या कमेंट्स करत आहेत.
क्लिक करा