Tap to Read ➤

श्राद्धाचा नैवेद्य वाढताना लक्षात ठेवा 'हे' नियम!

श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा स्वयंपाक हा अतिशय आदर्श मानला जातो. कारण त्यात शरीरासाठी आवश्यक सगळे जिन्नस असतात.
श्राद्धदिनी डावा, उजवा, समोरील व मध्य अशा चारी भागातील पदार्थ सांगितले आहेत. त्यालाच आपण चौरस स्वयंपाक म्हणतो.
श्राद्धाचे जेवण ज्या पानावर वाढले जाते, तूपामुळे सर्व रसांचे व्यवस्थित पाचन व्हावे हा त्यामागचा हेतू असतो.
श्राद्धाच्या पानाचा नैवेद्य दाखवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जातो.
डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, कोचकय, आमसुलाची चटणी हे पदार्थ असावेत.
उजवीकडे खीर, पालेभाजी, फळभाजी हे पदार्थ असावे.
समोर आमटी, कढी, पापड, कुरडई, भजी, उडदाचे वडे (माषवटक) हे पदार्थ असावेत.
मध्यभागी पोळी, पुरी, पक्वान्न, दूध, दहीसाखर हे पदार्थ असावेत.
अशा पानाचा नैवेद्य दाखवून कावळ्याचा अन्नाला स्पर्श झाला की मगच आपणही या सर्व रसांनी युक्त असलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त व्हावे.
क्लिक करा