Tap to Read ➤

स्ट्रेस - फ्री राहण्यासाठी फॉलो करा ८ मंत्र - SAKHI

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस - फ्री जगायला माणूस कुठेतरी विसरत चालला आहे. स्ट्रेस - फ्री जगण्यासाठी काही टिप्स आपल्याला मदत करतील.
कामाच्या व्यापात काहींना घरासाठी वेळ देता येत नाही. घरातील सदस्य आणि मित्रपरीवारासाठी आठवड्यातून एकदा वेळ काढा.
सध्या सगळ्यांना स्मार्ट फोन आणि संगणकाने घेरलं आहे. यातून ब्रेक घ्या, स्वतःला वेळ द्या.
स्वतःसाठी वेळ देणं आपण कुठेतरी विसरत चाललो आहे. वेळ काढून आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करा.
दिवसभरातून थोडं स्वतःच्या आवडीच्या कामाला वेळ द्या. त्यात पुस्तकं वाचा अथवा गाणी ऐका.
दररोज व्यायाम अथवा योग करणं आवश्यक. याने शरीराला उर्जा मिळते.
मेंटल हेल्थ उत्तम ठेवण्यासाठी नियमित मेडीटेशन करा. याने मन स्थिर राहील.
टेन्शन फ्री राहण्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, याने तुम्हाला आतून सकारात्मक वाटेल.
निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. याने आपल्याला नवी उर्जा मिळेल. यासह तणाव कमी होईल.
क्लिक करा