Tap to Read ➤

केस खूपच गळतात? शॅम्पू बदलूनही उपयोग नाही; ५ टिप्स, भराभर वाढतील केस

आजकाल केसांची वाढ न होणं ही समस्या खूपच कॉमन झाली आहे. तेल, शॅम्पू बदलून आणि पार्लर ट्रिटमेंट्स घेऊनही केसांची व्यवस्थित वाढ होत नाही.
केस वाढण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. पण या केमिल्सयुक्त उत्पादनांमुळे केसांवर हवातसा परीणाम दिसून येत नाही.
वाढत्या वयात केस गळण्याची समस्या वाढते तेव्हा महिलांमधील ताणतणावही मोठ्या प्रमाणात वाढतो. काही सोपी, घरच्याघरी करता येतील अशी योगासनं करून तुम्ही केस वाढवू शकता.
उत्तनासनामुळे केसांची वाढ चांगली होते. केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
मत्स्यासनानं केसांच्या समस्या टाळता येतात. यामुळे केस जलद गतीनं वाढण्यास मदत होते.
शीर्षासन केल्यानं केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते.
वज्रासनानंही केसांचं गळणं कमी होऊन केस सुंदर आणि लांबसडक होतात.
बालासन केल्यानं पोटाच्या समस्यांबरोबर केसांच्याही समस्या दूर होतात.
याशिवाय आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करा. प्रोटीन्सयुक्त पदार्थ खाल्ल्यानं केसांची वाढ होण्यास मदत होते.
क्लिक करा