Tap to Read ➤

अमेरिकन ओपन स्पर्धेत सर्वाधिक मॅचेस जिंकणारे 5 खेळाडू

जोकोविच किंवा फेडरर नव्हे तर हा खेळाडू आहे नंबर वन!
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पहिल्या लढतीत विजय मिळवत जोकोव्हिच याने रॉजर फेडररच्या या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील ८९ विजय मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
जोकोव्हिच एका विजयासह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचेल. मग पहिला कोण? इथं एक नजर अमेरिकन ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या आघाडीच्या ५ खेळाडूंवर
अमेरिकचा टेनिस स्टार जिमी कॉनर्स या यादीत सर्वात आघाडीवर आहे. या दिग्गजाने आपल्या कारकिर्दीत अमेरिकन ओपन स्पर्धेत ९८ विजय मिळवले आहेत.
सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने यंदाच्या हंगामातील पहिल्या लढतीतील विजयासह ८९ चा आकडा गाठला. तो नव्वदीच्या आकड्यापर्यंत पोहचणारा दुसरा खेळाडू ठरू शकतो.
स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने आपल्या कारकिर्दीत अमेरिकन ओपन स्पर्धेत ८९ विजय नोंदवले आहेत.
अमेरिकेचा टेनिस स्टार आंद्रे आगासी याने आपल्या घरच्या मैदानात रंगणाऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत ७९ विजय नोंदवले आहेत.
सर्वोत्तम टेनिसपटूंपेकी एक इव्हान लेंडल या यादीत ७३ विजयासह पाचव्या स्थानावर आहे.
क्लिक करा