Tap to Read ➤

५ मिनिटांचा 'हा' व्यायाम १५ दिवसांत करेल पोटाचा घेर कमी!

स्थूल होण्याची सुरुवात पोटाचा घेर वाढण्यापासून होते आणि तीच अनेक प्रकारच्या आजारांची सुरुवात ठरते.
तुमच्या व्यग्र जीवनशैलीत व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नसेल तर योग्य डाएटला 'या' एका व्यायामाची जोड द्या.
रिव्हर्स क्रंचेस : पाठीवर झोपून पाय डोक्याच्या बाजूने नेणे म्हणजे रिव्हर्स क्रंचेस!
यासाठी पाठीवर झोपा, पाय काटकोनात वर न्या आणि कमरेखालचा भाग उचलत दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने नेत हळू हळू खाली आणा.
हा व्यायाम नियमीतपणे केल्यास पोटाची चरबी वितळण्यास मदत होते आणि स्नायूंना बळकटी मिळते.
या व्यायामाने वेगाने तुमच्या कॅलरी बर्न होतात आणि वजनही वेगाने कमी होते.
तुमची चयापचय क्षमता अर्थात मेटाबोलिसम सुधारण्यास मदत होते आणि बॉडी शेपमध्ये येते.
ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी जड वस्तूचा आधार घेत त्याला धरून हा व्यायाम केला असता कंबरदुखी कमी होते.
सलग पंधरा दिवस हा व्यायाम केल्यामुळे तुमच्यात लक्षणीय बदल दिसू लागतात.
क्लिक करा