Tap to Read ➤

सवडीनं आवडीबद्दल बोलला विराट; MS धोनी AB सह ओठी आलं गेलचंही नाव

किंग कोहलीची खास मुलाखत अन् त्यातील चर्चेत असणाऱ्या गोष्टी
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपली आवड शेअर केलीये. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी
विराट कोहलीनं आवडत्या शॉट्ससंदर्भातील प्रश्नावर कव्हर ड्राइव्ह खेळायला खूप आवडते, असे सांगितले.
आवडत्या क्रिकेटबद्दल विचारलेल्या प्रश्नावर किंग कोहलीनं एबी डिव्हिलियर्स आणि धोनी या दोघांची नाव घेतली.
बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियम हे आवडत्या मैदानापैकी एक आहे, असे कोहली स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
प्रतिस्पर्धी संघाच्या रुपात कोहलीला आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाविरुद्ध खेळायला अधिक मजा येते.
मजेशीर अंदाजात वावरणाऱ्या आवडत्या खेळाडूसंदर्भात बोलताना त्याने ख्रिस गेलच्या नावाला पसंती दिली आहे.
विराट कोहलीला यावेळी तुझं आवडते शहर कोणते? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने सध्या मुंबई शहर असा रिप्लाय दिला. तो मुळचा दिल्लीचा असला तरी आता तो मुंबई शहराच्या प्रेमात पडल्याचे दिसते.
अरजित सिंह हा आवडता गायक असल्याची गोष्टही त्याने यावेळी शेअर केली आहे.
विराट कोहलीसाठी दिवाळी हा सर्व सणांमध्ये आवडता सण आहे.
क्लिक करा