करा उपासाची चटणी - एकदम परफेक्ट रेसिपी 

उपासाला करा मस्त चविष्ट चटणी. एकदम सोपी रेसिपी. 

उपासाचे पदार्थ अनेक असतात. मात्र ते फक्त दह्याशी खाण्यात मजा येत नाही. त्यासोबत काही तोंडी लावायला असेल तर पदार्थ आणखी स्वादिष्ट लागतो. 

उपासाचा वडा असो किंवा भात असो सगळ्यासोबत एकदम मस्त लागेल अशी खास उपास चटणी नक्की करुन पाहा. 

ही चटणी करण्यासाठी अगदी मोजके पदार्थच लागतात. पाहा कशी करायची चविष्ट चटणी. 

नारळ खरवडून घ्यायचा. ताजा नारळ असेल तर चटणी जास्त चविष्ट होते.

नारळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. मिरची आवडीनुसार घ्या. 

तसेच मिक्सरच्या भांड्यात थोडे शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे सोललेलेही चालतील तसेच सालांसकटही चालतील. 

त्यात चमचाभर दही घालायचे आणि अगदी थोडे पाणी घालायचे. तसेच चवी पुरते मीठ घालायचे. सारे पदार्थ एकत्र केल्यावर मस्त चटणी वाटून घ्यायची. पाण्याचे प्रमाण बेताचे ठेवायचे. 

चटणी वाटून झाल्यावर एका खोलगट वाडग्यात काढून घ्यायची. एका फोडणीपात्रात थोडे तेल किंवा तूप घ्यायचे आणि त्यात जिरे घालायचे. 

फोडणी तयार करायची आणि चटणीवर ओतायची. चव एकदम मस्त लागते. ही चटणी नक्की करुन पाहा. 

Click Here