सोमवार, ०३ मार्च २०२५ रोजी फाल्गुन विनायक चतुर्थी आहे. मराठी वर्षातील हे शेवटचे विनायक चतुर्थीचे व्रत आहे.
आताची एकूणच ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर बाप्पाची असीम कृपा होऊ शकेल, कसा प्रभाव असू शकेल? ते जाणून घेऊया...
मेष: व्यापारात एखादे नवीन कार्य सुरु करू इच्छित असाल तर त्यास विलंब होऊ शकतो. परंतु धीर धरल्यास कार्य होऊ शकेल. घाईत निर्णय घेऊ नये. मेहनत करण्यास तयार राहा.
वृषभ: आर्थिक उन्नती होईल. नोकरीत जेथे आहात तेथेच परिश्रम करावेत. नोकरीत बदल करण्याचा विचार करू नये. वैवाहिक जीवन सुखद होईल, मात्र वाणीवर नियंत्रण ठेवावे.
मिथुन: नवीन ओळखी वाढल्याने व्यापार वृद्धी, उन्नती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला काळ. प्रगती होऊ शकते. यशासह अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी मेहनत वाढवावी.
कर्क: चांगला काळ. नोकरी करणाऱ्यांस कालावधी उत्तम. मेहनत वाढवली तर यश मिळेल. वैवाहिक जीवनात जुन्या वादामुळे त्रास शक्य. योजनेविषयी गुप्तता पाळा.
सिंह: नोकरी करणाऱ्यांस जास्त मेहनत, संघर्ष करावा लागेल. तरच यश प्राप्ती होऊ शकेल. व्यापाऱ्यांना काळ चांगला. कुटुंबाला वेळ द्यावा.
कन्या: व्यापाऱ्यांसाठी चांगला काळ. लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांस कालावधी चांगला. पदोन्नती संभवते. वैवाहिक जीवनात एखाद्या जुन्या गोष्टीमुळे वाद होऊ शकतो.
मराठी वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी: कसे कराल व्रत? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता