Tap to Read ➤

EV च्या बॅटरीचे आयुष्य किती? खिशाला झटका लागण्यापूर्वी...

पेट्रोल, डिझेलच्या महागड्या दरांना कंटाळून लोक ईलेक्ट्रीक वाहनांकडे वळत आहेत. परंतू, ही इलेक्ट्रीक वाहने काही कमी खर्चिक नाहीत.
इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरल्या जातात. त्यांचे आयुष्य हे तीन ते पाच वर्षे एवढेच असते. तरीही तुम्ही योग्य काळजी घेतली आणि नशिबाची साथ असेल तर तुम्ही या बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता.
बॅटरीचे आयुष्य हे तिच्या चार्जिंग सायकलवर मोजले जाते. लिथिअम आयन बॅटरीचे ८०० चार्जिंग सायकल असतात. जर दिवसाला ३०-४० किमी चालविणे असेल आणि बॅटरी जर योग्यरित्या चार्ज केली तर ती आरामात ४-५ वर्षे जाऊ शकते.
बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्याने आणि शून्य टक्क्यांपर्यंत डिस्चार्ज केल्याने तिचे आयुष्य कमी होऊ शकते. कारण तुम्ही तिचे सायकल पूर्ण करता. तेच जर तुम्ही २० टक्क्यांच्या वर असताना चार्जिंग केले आणि ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केले तर तिचे लाईफ वाढू शकते.
जास्त उष्णता किंवा थंडी बॅटरीच्या कामगिरीवर परिणाम करू शकते. यामुळे बॅटरी उन्हाळ्याच्या दिवसात चार्ज करताना रात्रीच्या वेळी करावी. तसेच फिरून आल्यावर लगेचच चार्जिंगला लावू नये.
स्कूटरवर जास्त भार टाकल्याने बॅटरी लवकर खराब होऊ शकते.
वारंवार जोरात पिकअप घेतल्याने, वेगाने चालविल्याने आणि अचानक ब्रेकिंगमुळे बॅटरीवर अतिरिक्त भार पडतो.
बॅटरी कधी बदलावी...

इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी जलद डिस्चार्ज होऊ लागली, चार्ज होण्यास जास्त वेळ लागला किंवा तिची कार्यक्षमता कमी झाली, तर ते बॅटरी बदलण्याची वेळ आली आहे असे समजावे.
क्लिक करा