Tap to Read ➤

EPFO मधून कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता?

पाहा काय आहेत ईपीएफओचे नियम आणि किती पैसे काढता येतील.
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटनंतरच्या गरजा पुरवण्यासाठी ईपीएफओची स्थापना करण्यात आली. कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून यात दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते.
गरज भासल्यास तुम्ही यातून पैसे काढू शकता. परंतु त्यासाठी काही नियम आहेत. पीएफमधून तुम्ही आता ५० हजारांऐवजी १ लाख रुपये काढू शकता.
कर्मचारी रिटायर झाल्यानंतर पीएफमधून संपूर्ण रक्कम काढू शकते. तर कर्मचारी एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी बेरोजगार असेल तर त्यांना ७५ टक्के रक्कम काढण्याची परवानगी मिळते.
जर तुम्हाला वैद्यकीय गरजांसाठी पीएफ काढायचा असेल तर मूळ वेतनाच्या ६ पट रक्कम किंला पीएफमधील कर्मचाऱ्याच्या हिस्स्यातील जमा रक्कम किंवा व्याज जे कमी असेल ती रक्कम काढू शकता.
जर तुम्ही लग्नासाठी पैसे काढणार असाल तर तुमची ७ वर्षे सर्व्हिस पूर्ण असणं आवश्यक आहे. कर्मचारी आपल्या कुटुंबीयांच्या लग्नासाठी पैसे काढू शकतात. आपल्या हिस्स्याच्या जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येते.
अकाऊंट होल्डर आपल्या किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पीएफमधून पैसे काढू शकतात. यासाठी ७ वर्ष सेवा पूर्ण होणं आवश्यक आहे, तसंच यातून ५० टक्के रक्कमच काढता येते.
याशिवाय जमीन खरेदीसाठी किंवा घर खरेदीसाठी तुम्ही यातील रक्कम काढू शकता. जमीन खरेदीसाठी तुम्ही आपल्या बेसिक आणि महागाई भत्त्याच्या २४ पटींपर्यंत रक्कम काढू शकता. तर घर खरेदीसाठी बेसिक आणि महागाई भत्त्याच्या ३६ टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता.
क्लिक करा