महाराष्ट्रातील एलोरा येथील कैलास मंदिर पूर्णपणे एका डोंगरातून कापून बनवलं आहे.
हे मंदिर ८व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याने बांधलं. हिंदू, बौद्ध आणि जैन शिल्पकला इथे एकाच ठिकाणी पहायला मिळते.
विशेष म्हणजे इथलं संपूर्ण मंदिर एकाच खडकातून कोरलं आहे. संपूर्ण डोंगर कापून मंदिर साकारलं गेलं.
मंदिराची उंची जवळपास १०० फूट आहे. इतकं मोठं बांधकाम करण्यासाठी लाखो टन दगड हटवले गेले.
संशोधकांच्या मते, दगड काढण्याचं प्रमाण जवळपास ४,००,००० टन होतं. आणि हे करताना कोणताही तांत्रिक साधनसामग्री नव्हती.
मंदिरात सुंदर कोरीव मूर्ती आहेत. शिव, पार्वती, गणेश, विष्णू यांच्यासह महाभारत, रामायणातील प्रसंग येथे रेखाटले आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणावर काम होत असताना आजही इथं कोणतीही बांधकामाची चूक दिसत नाही.
याला जगातील Monolithic Wonder म्हटलं जातं. अशा प्रकारचं एकही मंदिर दुसरीकडे नाही.
UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून एलोरा लेणी जतन केली आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात.