Tap to Read ➤
तू अभी तक है हसीन और मै जवान! आजी-आजोबांचे ‘असेही’ लग्न!
प्यार वाली लव्ह स्टोरी पाहा ६४ व्या वर्षांनी पुन्हा का लग्न केलं आजीआजोबांनी
हर्ष आणि मृदू ही आजी आजोबांची जोडी सध्या सोशल मिडियावर लोकांचे मन जिंकत आहे.
गुजरातमध्ये राहणार्या या आजी-आजोबांच्या लग्नाला ६४ वर्षे पूर्ण झाली. दोघांचेही वय ८० च्या घरात आहे.
हर्ष व मृदू हे बालपणापासून एकत्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र मृदूच्या घरच्यांना त्यांचे नाते मान्य नव्हते.
ज्या काळामध्ये प्रेमविवाह कॉमन गोष्ट नव्हती त्या काळात पळून लग्न करण्याचा धाडसी निर्णय आजींनी घेतला.
तिने मैत्रिणीला एक चिठ्ठी लिहून दिली मैत्रिणीने चिठ्ठी घरच्यांपर्यंत पोहचवली. त्यामध्ये मी पुन्हा येणार नाही असे लिहिले होते.
कोणतेही विधी पार न पाडता त्यांनी माळ घालून झटपट लग्न उरकले होते. ६४ वर्षांनंतर मात्र साग्रसंगीत लग्न करण्याचा योग आला.
मुलांच्या तसेच नातवंडांच्या उपस्थितीमध्ये हर्ष व मृदू यांचा शुभ विवाह पार पडला. आजी तर त्यांच्या लाल गुजराती साडीमध्ये फारच सुंदर व आनंदी दिसत होत्या.
नेटकऱ्यांनी आता असे प्रेम फार कमी पाहायला मिळते अशा कमेंट्स करत आजी आजोबांचे कौतुक केले.
नव्या पिढीने संसारासाठी शिकवण या पिढीकडून घ्यायला हवी असंही अनेक जण म्हणाले.
क्लिक करा