आता उष्णतेमुळे जिभेला येणार नाही फोड; 'हे' ५ उपाय ठरतील फायदेशीर
उन्हाळ्यात तर हमखास काही जणांना तोंड येण्याची समस्या सतावते.
अनेकांना उष्ण, तिखट पदार्थ सहन होत नाहीत. ज्यामुळे बऱ्याचदा तोंडात फोड येणे, तोंड येणे किंवा तोंडात लालसर चट्टे येण्याची समस्या निर्माण होते.
उन्हाळ्यात तर हमखास काही जणांना तोंड येण्याची समस्या सतावते. त्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय पाहुयात.
तोंडात फोड आले असतील तर मीठाच्या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून ४-५ वेळा गुळण्या केल्यास तोंडातील फोड लवकर बरे होतात.
दह्यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्मांसह दाहक-विरोधी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे वेदना आणि सूज कमी होते. म्हणूनच, तोंडात फोड आल्यास दह्याचं सेवन करा.
कोमट पाण्यामध्ये २ थेंब लवंगाचं तेल टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. हा उपाय दिवसात २ वेळा केला तर तोंडातील फोड बरे होतील.
तोंडात फोड आले असतील तर त्यावर खोबऱ्याचं तेल लावा. (वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याविषयी लोकमत कोणताही दावा करत नाही.)
कपाळावर कुंकू का लावतात? काय आहे त्याचे आरोग्यदायी फायदे