पित्तावर गुणकारी आहे अळूची भाजी, अन्यही आहेत जबरदस्त फायदे

जिभेचे चोचले पुरवणारा अळू बहुगुणकारीदेखील आहे.

पावसाळा सुरु झाला की बाजारात अनेक रानभाज्या दिसू लागतात. यात खासकरुन अळू तर ठिकठिकाणी दिसू लागतो.

अळू म्हटलं की डोळ्यासमोर लगेच अळूच्या वड्या आणि अळूचं फदफदं येतं. परंतु, जिभेचे चोचले पुरवणारा अळू बहुगुणकारीदेखील आहे.

रक्त वाढीसाठी अळू उत्तम स्त्रोत आहे. तसंच ताकद वाढवण्यासाठीस मलप्रवृत्तीस आळादेखील घालण्यासाठी तो उपयोगी ठरतो.

बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा.

पित्ताचा त्रास होत असल्यास अळूच्या पानांचा रस व जिरेपूड एकत्र करुन ते चाटण घ्यावं.

 फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावल्यास वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा प्रभावित जागी लावावा.

गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात. (कोणतेही उपाय वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विद्या बालनचा मराठी नखरा!

Click Here