भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीराला कसा फायदा होतो जाणून घ्या.
अक्रोड हे एक सूपरफूड आहे, जे शरीरासाठी अंत्यत फायदेशीर मानले जाते. भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीराला कसा फायदा होतो जाणून घ्या.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ असते. जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे हृदय निरोगी राहाते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
यात अँटिऑक्सि़ंट्स, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई इत्यादींनी समृद्ध असलेले अक्रोड मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज खाल्ल्याने स्मरणशक्ती मजबूत होते.
अक्रोडमध्ये फायबर असतात, जे पचनाशी संबंधित समस्या दूर करतात.
यामध्ये प्रथिने तसेच फायबरचे प्रमाण चांगले असते. अक्रोड खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहाते.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, बायोटिन आणि अँटीऑक्सि़ंट्ससारखे घटक असतात. केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असते. तसेच सुरकुत्या देखील कमी होतात.
अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि खनिजे असतात. जे हाडांसाठी फायदेशीर असतात. नियमितपणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
भिजवलेल्या अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सि़डंट्स असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.