कमाई आहे, मात्र बचत होत नाही? 'या' ट्रिकने वाचवा पैसे
तुम्ही पैशांची बचत करण्यासाठी ही गोष्ट केलीये का?
जर तुमचे मासिक तुमचे उत्पन्न चांगले असेल; पण खर्च उत्पन्नाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर ती चिंतेची बाब आहे.
गुंतवणूक सल्लागार म्हणतात की, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या.
शिस्तबद्ध सवयी आणि स्मार्ट गुंतवणूक धोरणामुळे पैशांची बचत करणे अतिशय सोपे जाते. पैशांची बचत आणि गुंतवणूक करण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग जाणून घ्या.
तुमच्या एका तासाच्या कष्टाची किंमत काय, हे जाणून घ्या. यामुळे तुम्हाला खर्चाचा आढावा घेता येईल.
समजा तुमचा मासिक पगार ७५,००० रुपये आहे, तर तुमची रोजची कमाई सुमारे २,५०० रुपये आहे. जर ते २४ तासांत विभागले तर प्रतितास कमाई सुमारे १०० रुपये होईल.
तुम्ही १० लाखांची कार घेण्याचा विचार करत असाल तर तिची किंमत तुमच्या १४ महिन्यांच्या कमाई इतकी असेल.
म्हणजे १०,००,०००/१०० : १०,००० तास. (सुमारे १४ महिने) त्याचप्रमाणे, १ लाख रुपये किमतीचा आयफोन खरेदी करणे म्हणजे - १०,००,००/१०० : १,००० तास. (सुमारे ४२ दिवस).