अत्यंत काळजीपूर्वक मुलांची नख कापावी लागतात.
लहान बाळांची नखे कापणे म्हणजे मोठा टास्क असतो.
लहान मुलांची नख नेमक्या कशाप्रकारे कापावीत ज्यामुळे त्यांना त्रास होणार नाही हे पाहुयात.
शक्यतो मुलं झोपल्यानंतर त्यांची नख कापावीत.
बाळ रडत असेल, नख कापू देत नसेल तर प्रथम त्याला शांत करा. कारण, बाळ हालचाल करत असेल तर त्याला दुखापत होऊ शकते.
अंघोळ झाल्यानंतर शक्यतो मुलांची नख कापावीत. कारण, यावेळी नख मऊ असतात.
मुलांसाठी खास वेगळं नेलकटर येतं त्यानेच मुलांची नख कापावीत.
मुलांची नख कायम सरळ कापावीत. कधीही वक्र कापू नयेत. तसंच वर वाढलेलीच नख कापावीत.