रात्रीच्या वेळी कुत्रे का रडतात? देतात संकटाची चाहूल की नुसतीच हूल...
कुत्रे का रडतात, कुत्र्यांना एक अजब शक्ती असते...
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रात्रीच्या वेळी-अवेळी कुत्रे एकाएकी रडायला लागतात.
अनेकजण या रडणाऱ्या कुत्र्यांना ओरडून गप्प करतात. परंतू, हे कुत्रे असे का करतात, तुम्हाला माहितीए...
धार्मिक मान्यतांनुसार, असे म्हटले जाते की कुत्रा भुंकत किंवा रडत असेल तर काही अप्रिय घटना दर्शवते.
कुत्र्यांना येऊ घातलेला धोका किंवा अशी कोणतीही अप्रिय घटना अगोदरच जाणवते. म्हणूनच ते रडून किंवा भुंकून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात.
तुमच्या घरातील कोणीतरी व्यक्ती गंभीर आजारी पडण्याची शक्यताही वर्तविली जाते.
जर तुमच्या घराबाहेर किंवा दरवाजाजवळ रात्री उशिरा कुत्रा रडत असेल तर त्याच्या आजूबाजूला एक प्रकारची नकारात्मक शक्ती असण्याची शक्यता असते.
तुमचा पाळीव कुत्रा अचानक रडायला लागला किंवा खाणे पिणे बंद केले तर तुम्ही सावध राहावे. घरावर काहीतरी मोठे संकट येणार असल्याचे ते सांगतात, अशी मान्यता आहे.