Tap to Read ➤
जगातील प्राचीन ७ आश्चर्य माहिती आहे का? भारतात एकही नव्हते
जगातील ७ आश्चर्यांची २ प्रकारात विभागणी केली जाते. यातील प्राचीन काळातील अनेक आश्चर्य आज अस्तित्वात नाहीत.
गिझाचा भव्य पिरॅमिड: इजिप्तमधील गिझा येथे असलेला हा पिरॅमिड सुमारे ४५०० वर्षांपूर्वी बांधला गेला आहे.
बॅबिलोनचे टांगते उद्यान : इराकच्या बॅबिलोन शहरात असलेले हे उद्यान सुमारे २६०० वर्षांपूर्वी बांधले गेले होते.
ऑलिम्पियामधील झ्यूसचा पुतळा : ग्रीसमधील ऑलिम्पिया येथे असलेला हा पुतळा सुमारे २४०० वर्षांपूर्वी बांधला गेला होता.
एफिससचे आर्टेमिसचे मंदिर : तुर्कीमधील एफिसस येथे असलेले हे मंदिर सुमारे २६०० वर्षांपूर्वी बांधले गेले होते.
हॅलिकार्नाससची समाधी : तुर्कीमधील हॅलिकार्नासस येथे असलेली ही समाधी सुमारे २३५० वर्षांपूर्वी बांधली गेली होती.
रोड्सचा कोलोसस : ग्रीसमधील रोड्स बेटावर असलेला हा पुतळा सुमारे २३०० वर्षांपूर्वी बांधला गेला होता.
अलेक्झांड्रियाचा दिवा : इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे असलेला हा दिवा सुमारे २३०० वर्षांपूर्वी बांधला गेला होता.
प्राचीन जगातील ७ आश्चर्यांपैकी फक्त गिझाचा भव्य पिरॅमिड अजूनही अस्तित्वात आहे. इतर सर्व आश्चर्य काळाच्या ओघात नष्ट झालेली आहेत.
आधुनिक ७ आश्चर्यांमध्ये भारतातील आग्रा येथील ताजमहालाचा समावेश आहे.
क्लिक करा