बदलत्या वातावरणात 'अशी' घ्या काळजी 

बदलते वातावरण अंगावर येऊ नये , म्हणून करा हे उपाय. आजारपण टाळा.

ऑक्टोबर म्हणजे सकाळी गरमी आणि रात्री थंडी. वातावरणात होणाऱ्या या सततच्या बदलामुळे अनेक त्रास होतात. आजारपण तर सारखे येते. 

असे आजारपण टाळण्यासाठी काही सवयी बाळगणे गरजेचे आहे. अगदी सामान्य गोष्टी लक्षात ठेवा आणि सर्दी, खोकला, पडसं सारखे आजार टाळा. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आहार. चांगला आहार घेणे फार गरजेचे असते. फळे, भाज्या, जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असा आहार घ्या. 

शरीराला ताकद आरामातून मिळते. त्यामुळे झोपेचे चक्र सांभाळा. सलग ७ ते ८ तासांची झोप हवी. 

थंडीमुळे किंवा गरमीमुळे कामे टाळू नका. शरीर जास्त आळशी झाले तरी मग सुस्ती येते आणि मानसिक थकवा वाढतो. त्यामुळे कामं, व्यायाम चालूच ठेवा. 

स्वच्छता राखा. हात धुणे, पाय धुणे, बाहेरुन आल्यावर अंघोळ करणे इतरही काही सवयी लावून घ्यायच्या. 

आहारात हंगामी भाज्या असाव्यात. ज्या ऋतूत जे ताजे मिळते , पिकते तेच खावे. आरोगग्यासाठी ते फार पौष्टिक असते. 

Click Here