Tap to Read ➤

सूर्यास्तावेळी ५ गोष्टी करा, दिवेलागणीला लक्ष्मी येईल घरा; सुखाचा लाभ!

सूर्यास्ताचा कालावधी अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, असे सांगितले जाते.
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये सूर्योदयाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंचांग पद्धती सूर्योदयानुसार आचरली जाते.
तसेच सूर्यास्त अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. सूर्यास्तावेळी तिन्हीसांजेचा काळ दिवेलागणीचा मानला जातो.
तिन्हीसांजेला लक्ष्मी घरात येते. अशी लोकमान्यता आहे. दिवेलागणीचा कालावधी लक्ष्मी देवीशी संबंधित असतो, असे सांगतात.
दिवेलागणीवेळी काही कामे करणे शुभ मानले गेले आहे. याने लक्ष्मी देवीचे घरात शुभागमन होऊ शकते. देवीची कृपा लाभू शकते.
तिन्हीसांजेला लक्ष्मी देवीचे पूजन, उपासना, नामस्मरण, पूजन विशेष लाभदायक तसेच पुण्यफलदायी मानले जाते, असे सांगतात.
सूर्यास्तावेळी तिन्हीसांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा. यावेळी लक्ष्मी देवीचे मनापासून स्मरण करावे.
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये मौनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. दिवेलागणीला मौन धारण करावे, असे सांगितले जाते.
दिवेलागणीला पूर्वजांचे स्मरण अवश्य करावे, असे म्हटले जाते. एक दिवा लावून पूर्वजांना अर्पण करावा, असे सांगितले जाते.
तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी झोपू नये. जर या कालावधीत झोपले तर त्या व्यक्तीचे भाग्यही झोपते, असे सांगितले जाते.
सदर माहिती सामान्य गृहीतके, मान्यतांवर आधारित आहे. यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
क्लिक करा