मिरची कापल्यानंतर होतीये हातांची जळजळ? करा हे उपाय

मिरची कापल्यानंतर दाह झाली तर त्याची तीव्रता कशी कमी करायची ते पाहुयात.

काही मिरच्या या प्रचंड तिखट असतात. त्यामुळे मिरची कापल्यानंतर हाताची आग, जळजळ होते.

एकदा का हाताची जळजळ सुरु झाली की जवळपास २-३ तास ही दाह तशीच राहते. ही दाह,वेदना या सहन करण्यापलिकडे असतात. 

म्हणूनच, मिरची कापल्यानंतर दाह झाली तर त्याची तीव्रता कशी कमी करायची ते पाहुयात.

जर हातांची दाह खूप जास्त स्वरुपाची असेल तर हाताला दही चाळून लावा. हे दही लावतांना हलक्या हातानेच लावा. आणि, २०-२५ मिनिटे दही हाताला तसंच लावून ठेवा.

हातांची जळजळ असहाय्य होत असेल तर एका भांड्यात बर्फाचे खडे किंवा गार पाणी घ्या आणि त्यात हात बुडवून ठेवा.

साजूक तूप हा देखील हातांची जळजळ दूर करण्याचा चांगला पर्याय आहे. हाताला १०-१२ मिनिटांसाठी साजूक तूप लावून हात तसेच पंख्याखाली वाऱ्यावर धरा.

गुळाचा चहा प्याल तर चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील दूर

Click Here