Tap to Read ➤

गुलाबी साडीतील आनंदीचा बोल्ड लूक चर्चेत

अभिनेत्री दिव्या पुगावकरचे साडीतले फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
'मुलगी झाली हो' मालिकेतून माऊच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्या पुगावकरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
सध्या ती मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पाहायला मिळते आहे. ती या मालिकेत आनंदीची भूमिका साकारते आहे.
नुकतेच दिव्याने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
दिव्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
दिव्या पुगावकर हिने 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेआधी मुलगी झाली हो, प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या मालिकांमध्ये काम केले आहे.
तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे. या मालिकेतील माऊच्या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
क्लिक करा