आधी चित्रपटात झळकला, आता तो टीम इंडियाचा हिरो! किती मिळालं होतं मानधन?
वरुण चक्रवर्तीनं कोणत्या चित्रपटात काम केलं होत माहितीये? इथं जाणून घ्या सविस्तर
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अखेरच्या वेळी संघात निवड झाली, महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली अन् या संधीच सोनं करत वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियाचा हिरो ठरला.
पण तुम्हाला माहितीये का? क्रिकेटमध्ये हात आजमावण्याआधी वरुण चक्रवर्ती चित्रपटातही झळकलाय.
आपल्या जादूई फिरकीनं प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची गिरकी घेणाऱ्या या खेळाला क्रिकेटर नाही तर सिनेसृष्टीत रस होता. त्याला सहाय्यक दिग्दर्शक व्हायचं होते.
वयाच्या २५ व्या वर्षी त्याने सिनेसृष्टीत नशीब आजमावलं. जे हव ते मिळालं नसले तरी त्याला एका चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली.
२०१४ मध्ये वरुण चक्रवर्ती तमिळ चित्रपट 'जिवा'मध्ये काम केलं होते. विशेष म्हणजे यात त्याने एका क्रिकेटरची भूमिकाच साकारली होती.
एका मुलाखतीमध्ये त्याने या चित्रपटातील कामासाठी त्यावेळी दिवसाला १४०० रुपये मानधन मिळाल्याचा किस्साही शेअऱ केला होता.
चित्रपटात क्रिकेटरची भूमिका साकारणारा वरुण चक्रवर्ती आज टीम इंडियाचा हिरो झालाय. चॅम्पियन हा टॅगही त्याला लागलाय.