Tap to Read ➤

आषाढी एकादशी: ८ राशींवर विठूरायाची कृपा; लाभच लाभ, पुण्य फलदायी काळ!

देवशयनी आषाढी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या...
१७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. या दिवसापासून चातुर्मास सुरु होत आहे. बुधवारी आषाढी एकादशी आल्याने हा दिवस शुभ पुण्यदायी मानला गेला आहे.
विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जमले आहेत. या दिवशी अनेक शुभ योग जुळून आलेत. कोणत्या राशींवर विठ्ठलाची कृपा होऊ शकेल? कसे लाभ मिळू शकतील? पाहुया...
मेष: अचानकपणे कोठून तरी मोठा धनलाभ होण्याची संभावना आहे. कारकीर्द-व्यवसाय यांच्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. इतरांवर डोळेझाक विश्वास ठेवू नका.
वृषभ: कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलावे. कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न व परिश्रम करावेच लागतील. कामाचा भार जास्तच राहील.
मिथुन: दिनचर्या व आहारावर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. कमिशनवर काम करणाऱ्या व्यक्तींना मानसिक तणाव जाणवेल. एखाद्या घटनेने मन प्रसन्न होईल.
कर्क: कामात अडथळे आल्याने मन खिन्न होईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या स्पर्धकांशी मोठी टक्कर द्यावी लागू शकते. कार्यक्षेत्र व कुटुंबात समतोल साधणे अवघड होऊ शकते.
सिंह: नोकरदारांना पदोन्नती किंवा पगारवाढ संभवते. वरिष्ठांशी संपर्क वाढतील. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळून संचित धन वृद्धिंगत होईल. राजकारणातील व्यक्तींना उच्च पद शक्य.
कन्या: कार्यक्षेत्री विरोधकांपासून सावध राहावे. कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नये. व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावे.
तूळ: सुख-समृद्धीचा काळ. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. बदलीच्या किंवा पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असाल तर मनोकामना पूर्ण होऊ शकते. व्यवसायातील अनपेक्षित लाभाने आनंद वाढेल.
वृश्चिक: स्वजनांशी मतभेद होण्याची संभवतात. वाणी व वागणुकीवर नियंत्रण ठेवावे. मित्राच्या मदतीने नवीन कार्याची योजना आखाल. धावपळ व खर्चामुळे मन काहीसे खिन्न होईल.
धनु: आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. सरकार-दरबारी प्रलंबित असलेल्या कामांना गती येईल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.
मकर: धनलाभास व उन्नतीस अनुकूल संधी उपलब्ध होतील. नोकरदारांना अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. व्यापारात अपेक्षित लाभ प्राप्त होईल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.
कुंभ: सरकार-दरबारी प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. मोठ्या यशाने मन प्रसन्न होईल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. बाजारातील तेजीचा लाभ घेऊ शकाल.
मीन: शुभदायी व लाभदायी काळ. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य. एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण. संचित धनात वाढ.
क्लिक करा