Tap to Read ➤

दीपिका पादुकोण सांगते, मनातले काहूर, जीव कुरतडतो आणि..

बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करतेय...
तिचं गोड हास्य, गालावरची मोहक खळी तिच्या चाहत्यांना वेड लावते. तिचं खळाळतं हास्य पाहून अनेक जण सुखावतात. पण याच हास्यामागे काही वर्षांपुर्वी दु:खाची एक गडद रेषा होती...
सगळ्यांसमोर हसणारी, सगळं काही नाॅर्मल आहे असं दाखवणारी दीपिका काही वर्षांपुर्वी प्रचंड डिप्रेशनमध्ये होती. मानसिक त्रासामुळे २०१५ हे वर्ष तिच्यासाठी खूप कठीण गेलं.
मानसिक आजाराविषयी बोलताना दीपिका म्हणते की एकेदिवशी सकाळी उठल्यावर मला खूप रिकामं वाटलं. आता पुढे काय करू असा मोठा प्रश्न पडला, खूप भकास वाटू लागलं..
दिपिका म्हणते तिच माझ्या आजाराची सुरुवात असावी.. यानंतर सतत रडू येणं, मनात काही तरी टोचत राहणं, बाहेर जाऊ नये- काम करू नये- कुणाशी बोलू नये असं वाटत होतं...
Live Love Laugh Foundation या संस्थेच्या मदतीने तिने या आजारावर मात केली आणि आज ती मानसिक आजाराविषयी जनजागृती करते...
माझ्या सांगण्याने एखादी व्यक्ती जरी डिप्रेशनची लक्षणं ओळखून त्यातून बाहेर पडू शकली, तरी ते माझ्यासाठी खूप आहे, असं ती नेहमीच म्हणते आणि मोठ्या उमेदीने लोकांना मानसिक आजारांविषयी जागृत करतेय..
क्लिक करा