राशीभविष्य: मैत्रिणी, पत्नीकडून लाभ होईल; विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा.
आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत यश व प्रतिष्ठा मिळेल.
आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
आज अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल.
आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई-वडिलांशी मतभेद संभवतात. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा.
आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. समाजात मान - सन्मान मिळेल.
आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
आज आपण तन-मनाने खुश व ताजेतवाने राहाल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. आनंददायक बातम्या मिळतील.
आजचा दिवस कष्टदायक. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. यामुळे मानसिक दृष्ट्या सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा.
आजचा दिवस नोकरी-व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल. विवाहोत्सुक युवक-युवतींचे विवाह ठरतील.
आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी-व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल.
आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकणार नाही.