Tap to Read ➤

राशीभविष्य : अवैध कामामुळे बदनामी होण्याची शक्यता...!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. निर्णयशक्तीच्या अभावाने द्विधा मनःस्थिती होईल.
आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. नवे संबंध व नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल.
आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. त्यामुळे आपणास जास्त प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. सरकारी कामात यश मिळेल.
आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल. नोकरीत सुद्धा लाभ होतील.
नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. अवैध कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे.
मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल. भिन्नलिंगी व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल.
आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. भिन्नलिंगी मित्रांचा सहवास घडेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात कराल.
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल. जुगारसदृश बाबींपासून शक्यतो दूर राहावे. प्रवास सुद्धा शक्यतो टाळावेत.
आज मनात औदासिन्य दिसून येईल. एखादी मानहानी संभवते. वित्तहानी सुद्धा संभवते.
आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतात. विद्यार्थ्यांना विनासायास अभ्यास करता येईल.
आज वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होऊन नैराश्य येईल.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवत असला तरी खर्च वाढणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.
क्लिक करा