राशीभविष्य : धन- संपत्ति, मान-सन्मानाची प्राप्ती होईल
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आर्थिक लाभ सुद्धा होईल. मित्र व सगे सोयरे ह्यांच्या भेटीने घरातील वातावरण आनंदी होईल. उत्तम कपडे व भोजन प्राप्ती होईल.
स्नेही व कुटुंबीय ह्यांच्याशी मतभेद झाल्याने आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने मन निराश होईल.
मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल. सूर्याचे मीनेतील भ्रमण आपल्यासाठी लाभदायी होईल.
कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आईची तब्बेत उत्तम राहील. धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती होईल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल.
आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी येतील व वरिष्ठ नाराज झाल्याने तुम्हाला दुःख होण्याची शक्यता आहे.
आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपला आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. हा महिना आपल्यासाठी चांगला असेल.
शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल.
कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. संतती विषयक चिंता राहिल्याने मन बेचैन होईल.
आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. मान - प्रतिष्ठेची हानी होईल.
आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. स्नेहीजन घरी आल्याने आनंद वाटेल.
आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण - घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.