आजचे राशीभविष्य : धनलाभ होईल, नव्या कामाचा आरंभ करण्यास अनुकूल दिवस
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...?
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. मन अशांत राहील. आपला प्रत्येक प्रयत्न चुकीच्या मार्गाने होण्याची शक्यता आहे.
नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. शारीरिक थकवा व मानसिक व्यथा अनुभवाल. कार्यालयात कामाचा व्याप वाढल्याने अधिक थकवा जाणवेल.
आजचा दिवस आनंदात व भोग विलासात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. मित्र व प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल.
आज घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. प्रकृती उत्तम राहील. नोकरीत लाभ होतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. मित्र - मैत्रिणींच्या सहवासाने आनंद होईल.
आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. मित्र भेटतील. स्त्री वर्गाकडून लाभ होईल.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्वकीयांचे गैरसमज होतील. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.
आज भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घराशी संबंधित प्रश्नांची चर्चा होईल. धनलाभ होईल. नव्या कामाचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल.
आजचा दिवस साधारणच आहे. कुटुंबात वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचार येतील.
आज संततीचे सुख व स्वास्थ्य सुधारेल. आपल्या हातून एखादे मंगल कार्य संपन्न होईल. आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जोडीदारा कडून सुख - समाधान मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
आज आरोग्याच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. मांगलिक कार्यावर खर्च कराल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल.
आजचा दिवस मंगल कार्य व नवीन कार्य ह्यांच्या आयोजनासाठी अनुकूल आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. होईल. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल.
आज आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्यांची येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होईल.