विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. आई कडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन व भेटवस्तू मिळाल्याने आपला आनंद वाढेल.
आज घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. गैरसमजा पासून जपून राहावे.
आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. वाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील.
आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. नोकरी - व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील.
आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. खर्च खूप होईल. गूढ विद्या व रहस्य ह्यांची गोडी लागेल.
आज आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित करू शकता. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपणास खूप आनंद होईल.
प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर आपण मात करू शकाल. मित्र - मैत्रिणींचा सहवास तसेच प्रणयालापामुळे आपला आनंद व्दिगुणित होईल.
आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. वाद - विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल. संततीची काळजी वाटेल. धनप्राप्ती होईल.
आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. स्त्रीवर्गा कडून काही नुकसान होईल किंवा काही कारणाने त्यांच्याशी मतभेद होतील.
आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.
आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल.