Tap to Read ➤

राशीभविष्य: या लोकांना प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल, अचानक धनखर्च होईल..

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.
आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्याना चांगली संधी प्राप्त होईल.
आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल.
आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल.
आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. वरिष्ठांशी वाद - विवाद टाळा.
अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा ह्यापासून दूर राहणे उचित ठरेल.
आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील.
आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील.
आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल.
आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील.
आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे.
क्लिक करा