Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष : आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल.
वृषभ : आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील.
मिथुन : आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल.
कर्क : आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र व स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल.
सिंह : आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल.
कन्या : आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी ह्यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल.
तूळ : कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल.
वृश्चिक : आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. पत्नी व संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील.
धनु : कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मकर : साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील.
कुंभ : आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल.
मीन : स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल.
क्लिक करा