Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...,
मेष : आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
वृष : आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे.
मिथुन : आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कर्क : आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील.
सिंह : आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल.
कन्या : आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. दुपार नंतर मात्र आत्मविश्वास वाढेल.
तूळ : मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल.
वृश्चिक : दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल.
धनु : आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर : आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील.
कुंभ : लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात.
मीन : मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही.
क्लिक करा