स्वयंपाकघरात फोडणीसाठी वापरला जाणारा कढीपत्ता चव,रंग आणि सुंगधासाठी ओळखला जातो. परंतु हा कढीपत्ता फक्त चवच वाढवत नाही तर अनेक आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे.
कढीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नियमितपणे याचे सेवन केल्यास त्वचा आणि केसांना पोषण मिळते. डॉक्टरांनी कढीपत्त्याचे पाणी उकळवून प्यायल्याने फायदे काय होतात हे सांगितले आहे.
कढीपत्त्यामध्ये विविध गुणधर्म आहेत. जे आतड्यांचे आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते.
जर आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असेल तर कढीपत्त्याचे सेवन फायदेशीर ठरेल. तसेच यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कढीपत्त्याचे पाणी बहुगुणी ठरेल. रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
जर आपल्याला कढीपत्ता रोज खायचा असेल तर तो चावून किंवा पाण्यात उकळवून त्याचे पाणी पिऊन शकता. यामुळे आपल्या केसांना आणि त्वचेला फायदा होईल.