शरीरासाठी ताक चांगलं की दही हे आज जाणून घेऊयात.
आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा असा सल्ला कायमच डॉक्टर देतात.
दही आणि ताक या दोघांचा आहारात समावेश करणं शरीरासाठी फायद्याचं आहे. परंतु, दोघांपैकी अधिक गुणकारी काय? असा प्रश्न निर्माण होतो.
आज जाणून घेऊयात शरीरासाठी ताक चांगलं की दही.
दही खाल्ल्यामुळे पचनक्रिया चांगली होते. तसंच शरीराला पोषक तत्वही मिळतात.
दह्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्नायूंसाठी ते फायद्याचं ठरतं.
दह्यामध्ये Probiotics असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
दह्याप्रमाणेच ताकाचं सेवन केल्यामुळेही पचनक्रिया सुरळीत होते.
अपचन किंवा अॅसिडीचा त्रास ताक प्यायल्यामुळे दूर होतो.
ताक हा अनेक आवश्यक पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे. यात कॅल्शियम, व्हिटॅमीन B12, रिबोफ्लेविन आणि फॉस्फरसचा समावेश होतो.
आयुर्वेदानुसार, दही आणि ताक या दोघांमध्ये ताक हे अधिक गुणकारी आणि फायद्याचं आहे.