UPI शी क्रेडिट कार्ड लिंक केलंय? होऊ शकतं 'हे' नुकसान
आरबीआयनं आता क्रे़डिट कार्ड लिंक करण्यासही सूट दिली आहे.
आतापर्यंत डेबिट कार्ड किंवा सेव्हिंग अकाऊंट युपीआयला जोडलं जात होतं. परंतु आरबीआयनं आता क्रे़डिट कार्ड लिंक करण्यासही सूट दिली आहे.
युपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक केल्याचे काही फायदे आहेत. तर त्याचं नुकसानही आहे. जाणून घेऊया.
युपीआयद्वारे तुम्ही छोटा मोठा खर्च करता. बँक बॅलन्स पाहून तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. क्रेडिट कार्ड लिंक झाल्यामुळे तुमचं ओव्हर स्पेंडिंग वाढू शकतं.
ज्या ठिकाणी मोबाइल कनेक्टिव्हीटी चांगली नसेल, त्या ठिकाणी युपीआयशी लिंक क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स फेल होऊ शकतात. याचंही नुकसान होऊ शकतं.